जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । अमळनेर शहरातील विविध संस्था व संघटनांनी आज विशेष उपक्रमांचे आयोजन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. वृक्षारोपणासह रोपांचे वाटप आणि पर्यावरणविषयक स्पर्धाचाही यात समावेश केला.
तसेच शहरातील मंगळग्रह सेवा संस्थे च्या “मंगळ वन” मध्ये तर जागतिक पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मंगळग्रह मंदिराचे सचिव एस.बी.बाविस्कर, मंदिराचे सेवेकरी विनोद कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदमसिंग पाटील, नाना पाटील, अंबादास देवरे, विशाल पाटील यांचे सहकार्य लाभले.