नाशिक परिक्षेत्राला मिळणार नवे अधिकारी; दत्ता कराळेंसह २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मे 15, 2026 6:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करत २४ वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज शुक्रवारी (१५ मे) जारी केले आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील अप्पर पोलीस महासंचालक, सहआयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात आणि राज्याच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

ips

या बदलीमध्ये नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोगावर बदली करण्यात आलीय.

राज्यातील कुठल्या बडा अधिकाऱ्यांच्या कुठे बदली?

कृष्ण प्रकाश: अपर पोलीस महासंचालक (प्रशासन)

दत्ता कराळे: विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग

प्रवीण पडवळ: विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

लखमी गौतम: विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था

मनोज शर्मा: सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई

सुवेज हक: सह आयुक्त (प्रशासन), मुंबई

महेश पाटील: विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय)

परमजित दहिया: विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक

सी के मीना: विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण विभाग

संजय दराडे: पोलीस सह आयुक्त, पुणे

रंजन शर्मा: विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

सुनिल फुलारी: विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व)

राजेश प्रधान: पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई

निशिथ मिश्रा: विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण

जय कुमार: विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन (पद अवनत करुन)

संजय येनपुरे: विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा

संजय जाधव: अपर पोलीस आयुक्त, ठाणे

दिपक साकोरे: अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई

पंजाबराव उगले: विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ (पद अवनत करुन)

एस. व्ही. पाठक: विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

विनायक देशमुख: नियंत्रक, वैधमापन

ज्योती प्रिया सिंग: विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक (पदोन्नतीने)

अनिल कुंभारे: पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई

सत्य नारायण: पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories