धक्कादायक ! मुलाला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार 

एप्रिल 22, 2022 9:17 PM

crime 3

      जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला देखील बेदम  मारहाण केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

       अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय  विवाहित पती आणि मुलांसह वास्तव्यात आहे दिनांक १९ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दरम्यान विवाहित महिला बकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेली असतांना संशयित आरोपी नितीन एकनाथ जाधव यांनी विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला विवाहितेने हा प्रकार घरी आल्यावर तिच्या पतीला सांगितले याचा जाब विचारासाठी विवाहितेचा पती संशयित आरोपी नितीन जाधव याच्या कडे गेला असता त्यावेळी सोनाली जाधव ,संदीप जाधव ,नितीन चा पाहुणा ,नितीन ची आत्या जिजाबाई,सुनिता वाल्मिक जाधव , लिलाबाई जाधव , अनिल देविदास काळे यांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली  विवाहीतिने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे हे तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now