जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२३ । जून महिना सुरू झाला असून पावसाचे वेध लागले आहेत. सध्या जळगावात सूर्यनारायचा प्रकोप पाहायला मिळतोय. उन्हाची तीव्रता कमी होताना दिसत नसून उकाड्याने घामाघूम झालेला जळगावकर यातून कधी सुटका मिळेल याची प्रतीक्षा करतोय.

जळगावातील तापमान हे ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर असल्याचे पाहायला मिळत आहे. जरी ढगाळ हवा वातावरण संध्याकाळी पाहायला मिळत असले, तरी दिवसभर जळगावकरांना उकाडाच सहन करावा लागत आहे.

दरम्यान कोल्हापुरात काल ९ जून रोजी कमाल तापमान अंदाजे ४२.३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज १० जून रोजी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही ठिकाणी आज म्हणजेच १० जून ते १२ जून दरम्यान पावसाचा अंदाज आहे.
सध्या उकाडा वाढतच चाललेले आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आहवान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, केरळात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल वेगाने होत असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी उकाडा वाढला आहे.







