जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी एकसंघ राहून पक्षाचा प्रचार-प्रसार करतांनाच आपला कुणी अपप्रचार करत असेल तर त्यांना जोरदार उत्तर द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

धरणगाव तालुक्यातील युवासेनेतर्फे ५७ युवासेना शाखांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी युवासेना शाखेच्या ५७ शाखा प्रमुख व ५७ उपशाखा प्रमुखांची निवड करण्यात आली. गुलाबराव पाटील यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.
. एम. पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, बाजार समितीचे संचालक गजानन पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, युवसेना उपजिल्हा संघटक भैय्या मराठे सर, युवासेनेचे आबा माळी, चेतन पाटील, भैय्या माळी, दीपक भदाणे, पप्पू भावे, विलास महाजन आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक रविंद्र कंखरे, सूत्रसंचालन भैया मराठे यांनी केले. आभार आबा माळी यांनी मानले









