⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

…तर १४ एप्रिलला तहसील कार्यालयासमोर धरणे

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । एरंडोल तालुक्यातील वाळूची होणारी चोरी अद्यापही थांबलेली नाही. सद्धा:स्थितीत सर्व वाळूचे ठेके बंद आहेत. परंतु उत्राण, हनुमंतखेडे, वैजनाथ, टाकरखेडे, कढोली परिसरातील असलेल्या गिरणा नदीच्या पत्रातून दररोज मोठ्या प्रमाणात वाळू रात्रीच्या दिवस करून उचलली जात आहे. याकडे महसूलच्या अधिकारी यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच नैसर्गिक हानी देखील होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई कारवी असे मागणी येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांना विजय महाजन यांनी दिले आहे.

तालुक्यातील चोरट्या मार्गाने होणारी वाळूची चोरी तात्काळ न थांबविल्यास दि. १४ रोजी तहसील कार्यालयात एरंडोल तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने धरणे करण्यात येईल असा इशारा ही दिला आहे.