पतीच्या त्रासाला‎ कंटाळून प्राशन केले फिनाईल

जुलै 20, 2022 10:53 AM

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । लग्नात खर्च झालेले साडेचार लाख‎ रुपये माहेरहून परत आणावे अशी‎ मागणी करीत एका पतीने पत्नीला‎ मारहाण केली. पतीच्या त्रासाला‎ कंटाळून तिने फरशी साफ‎ करण्यासाठी वापरले जाणारे हार्पिक‎ प्राशन करून आत्महत्या करण्याचा‎ प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 13T124638.838 jpg webp

गायत्री चेतन कोळी (वय १९, रा.‎ रामेश्वर कॉलनी) यांनी पोलिसांत तक्रार दिली. गायत्री हिचे लग्न चेतन‎ शांताराम कोळी याच्याशी झालेले‎ आहे. सोमवारी (१८ जुलै) चेतनने‎ पत्नी गायत्री हिला त्याची बहीण‎ प्रियंकाच्या घरी घेऊन जायचे होते.‎ गायत्रीने सोबत येण्यास नकार दिला.‎ या कारणामुळे दोघांमध्ये वाद सुरू‎ झाले. यात चेतनसह त्याची आई‎ कल्पना कोळी यांनी गायत्रीला‎ मारहाण केली. लग्नात खर्च झालेले‎ साडेचार लाख रुपये आत्ताच्या‎ आता माहेरहून परत घेऊन ये अशी‎ मागणी केली.

गायत्रीने नकार‎ दिल्यानंतर चेतन, कल्पना‎ कोळीसह नणंद प्रियंका हिने देखील‎ मारहाण केली. या त्रासाला कंटाळून‎ गायत्रीने थेट आत्महत्या करण्याचा‎ प्रयत्न केला. उपचारानंतर तिची‎ प्रकृती सुधारली. त्यानंतर पोलिसांनी‎ तिचा जबाब घेतला. त्यावरुन चेतन‎ कोळी, कल्पना कोळी व प्रियंका‎ कोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now