तीन गावठी कट्टे, १४ जिवंत काडतुसांसह एकाला पकडले; दोघी फरार

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दरोडेखोरांना तीन गावठी कट्टे आणि १४ जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली. ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस पथकांनी केली. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

crime 81 jpg webp

चोपडा तालुक्यातील तेल्या घाटाखाली शनिवारी दुपारी 3 वाजता एका पांढर्‍या रंगाच्या स्कार्पिओ (एम.एच१२ एफ.यू००५१) या वाहनातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या गणेश बाबासाहेब केदारे २४, पाडळी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर), कालिदास दत्तात्रय टकले (28, हरताळा, ता.पाथर्डी), विकास अप्पासाहेब गिरी (२२, पाडळी, ता.पाथर्डी) यांना अटक करण्यात आली. संशयीताच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे व १४ जिवंत काडतूसे तसेच तीन मोबाईल व वस्तारा असा एकूण सहा लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मध्यप्रदेशातील उमर्टी येथील दोघे संशयीत पसार झाले. या प्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे महासंचालक पथकातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहोम, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, विशेष पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, चोपडा उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, एएसआय बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, नारायण लोहरे, चोपडा ग्रामीणचे हवालदार लक्ष्मण शिंमाणे व प्रमोद पारधी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now