घरफोड्यांमधील तिघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

ऑक्टोबर 15, 2025 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या असून चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याचं दिसत आहे. अशातच मुक्ताईनगर शहरात गेल्या पंधरा दिवसापासून दिवसा व रात्री घरफोड्या व दोन वाहनांच्या चोऱ्या झाल्या होत्या, या घरफोड्यांमधील तीन आरोपींना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

crime 2022 06 12T094729.817 jpg webp

प्रदीप हिवराळे (३० वर्ष), अतुल हिवराळ (३० वर्ष ), रवी हिवराळे (४० वर्ष, सर्व (रा. अंबिकापूर ता. खामगाव) असं चोरट्यांचे नाव असून त्यांच्याकडून चोरी गेलेली दोन वाहने, ९४ हजार पाचशे रुपयांचे दागिने व दहा हजार रुपये रोख असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मुक्ताईनगर शहरात गेल्या पंधरा दिवसापासून दोन ठिकाणी आंबेडकर नगर व पंचायत समिती जवळ घरफोडी झाली होती तसेच घोडसगाव व मुक्ताईनगर येथून दोन मोटारसायकली चोरून नेल्या होत्या या संदर्भात गुप्त माहितीनुसार पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या नेतृत्वात पथकाने तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले.

त्यांनी चोरीत वापरलेली चार चाकी डिझायर हे वाहन सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले. न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला अधीक वेग दिला असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now