⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

अरे बापरे.. यावल पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसागणित वाढतच आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढू लागताच प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. यावल पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

यावल शहरातही हळूहळू कोरोना पाय पसरत असतानाच सोमवारी यावल पोलिस ठाण्यातील तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यावल पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचार्‍याचा कोरोना अहवाल यावल ग्रामीण रुग्णालयात पॉझीटीव्ह आला तर अन्य दोन पोलिस कर्मचार्‍यांचा कोरोना अहवाल जळगाव सामान्य रुग्णालयात पॉझीटीव्ह आल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासनाने बाधीत कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला आहे.

हे देखील वाचा :