⁠ 
सोमवार, मे 27, 2024

Jalgaon Loksabha : मतदारांनो.. 38 उमेदवारांचे चिन्हे लक्षात कशी ठेवणार, उमेदवारांना मिळालेली चिन्हे अशी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार रिंगणात असून प्रत्येकाला वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. जळगाव मतदारसंघात १४ उमेदवारांची १४ चिन्हे, तर रावेर मतदारसंघात २४ उमेदवारांची २४ चिन्हे आहेत. आता ही चिन्हे कशी लक्षात ठेवावीत, असा प्रश्‍न मतदारांसमोर आहे.

माघारीनंतरी रिंगणातील सर्वच उमेदवार आता प्रचाराला लागले असून एका उमेदवाराची प्रचार फेरी घराकडून गेली, की दुसरी, मग तिसरी, अशा एका पाठोपाठ एक प्रचार फेऱ्या निघत असल्याने मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. मात्र, एवढे चिन्हे आणि तेही लवकर लक्षात नाहीत. उमेदवारही आवर्जुन मतदार भेटीत आपल्या नावाचा कागद, चिन्ह देऊन अमूक चिन्हाकडे लक्ष द्या, असे सांगत आहेत.

एकीकडे प्रचार सभांची तयारी, तर दुसरीकडे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली, मेळावा, सभांमुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे. येत्या १३ मे रोजी जळगाव आणि रावेरसाठी मतदार पार पडेल. तरी उमेदवारांना केवळ ११ दिवसच प्रचाराला मिळणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक रात्रन्‌दिवस प्रयत्न करीत आहेत.

निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली चिन्हे अशी
जळगाव मतदारसंघात-
मशाल, हत्ती, कमळ, सीसीटीव्ही कॅमेरा, सिलिंडर, गळ्याची टाय, आईस्क्रीम, ऑटो रिक्षा, नरसाळे, शिवण यंत्र, ऊस शेतकरी, प्रेशर कुकर, बॅट, अशी चिन्हे मिळाली आहेत.

रावेर मतदारसंघात- फळांची टोपली, हॉकी आणि बॉल, कमळ, हत्ती, तुतारी वाजविणारा माणूस, सिलिंडर, गॅस शेगडी, प्रेशर कुकर, संगणक, ऑटो रिक्षा, तुतारी, ट्रक, शिट्टी, ऊस शेतकरी, बॅट, दूरदर्शन, एअर कंडिशनर, कपाट, खाट, पाटी, सफरचंद, बासरी, बेबी वाकर, जहाज, अशी चिन्हे मिळाली आहेत.