⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावल पोलीस ठाण्याचे पीआय मानगावकरांची तडकाफडकी बदली ; त्यांच्या जागी ‘यांची’ नियुक्ती..

यावल पोलीस ठाण्याचे पीआय मानगावकरांची तडकाफडकी बदली ; त्यांच्या जागी ‘यांची’ नियुक्ती..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मानगावकर यांची पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या प्रभारीपदी रावेरचे सपोनि हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आलीय. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यावल तालुक्यातील दहिगाव येथे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून येथे ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक मानगावकर कंट्रोल जमा
दरम्यान, या दंगलीच्या विषयाला घेवून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांची प्रभारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे. या बदलीमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.