⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पत्त्याच्या क्लबवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच, सहाय्यक फौजदारसह दोन पोलीस अडकले जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्युज । २४ मार्च २०२३ । पत्त्याच्या क्लबवर कोणतीही कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयाची लाच घेणाऱ्या फैजपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदारसह दोन पोलीस नाईकास जळगाव एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

१) हेमंत वसंत सांगळे, वय-५२ वर्ष, स.फौ.९१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन (रा. भारत एंटरप्रायजेस मागे,यावल रोड ,फैजपुर), २) किरण अनिल चाटे, वय-४४ वर्ष, पो.ना./९३० नेम.फैजपुर पोलीस स्टेशन (रा.विद्या नगर, फैजपुर), ३) महेश ईश्वर वंजारी, वय-३८ वर्ष, पो.ना./२०१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन (रा.लक्ष्मी नगर, फैजपुर) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार?
यातील तक्रारदार यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे वरील आलोसे क्रं.१ व २ यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केल्याबाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आज तक्रार देवून फैजपुर पोलीस स्टेशन येथे जावून वरील दोन्ही आरोपीतांची भेट घेण्यास गेले असता त्यांना वरील आलोसे क्रं.१ हे भेटले त्यांनी तक्रारदार यांचेकडे कामाची व पैशाची बोलणी करून आलोसे क्रं.१ यांनी त्यांचे मोबाईल फोनवरून आलोसे क्रं.२ यांना फोन करून तक्रारदार हे देत असलेल्या पैशांबद्दल बोलणी करून किती पैसे घ्यायचे याबाबत स्वतः बोलणी करून तक्रारदार यांचेकडे फोन देवून तक्रारदार व आलोसे क्रं.२ यांचे बोलणे करून दिले.आलोसे क्रं २ यांनी त्यांचे फोनवरून आलोसे क्रं १ यांच्या फोनवर बोलून लाचेच्या रक्कमेत तडजोड करून सदर लाच रक्कम आलोसे क्रं.१ यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आलोसे क्रं १ यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व आलोसे क्रं.२ यांचेसाठी ३,०००/- रुपये लाचेची मागणी करून पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील अंमलदारांसाठी १,०००/-रु.अशी एकुण दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे क्रं.१ यांनी पंचासमक्ष स्वतःस्विकारून आलोसे क्रं.३ यांचेजवळ दिली असता आलोसे क्रं.३ यांना सदर रक्कम पत्त्याचा क्लब सुरळीत चालु देण्यासाठीची माहिती असतांना त्यांनी ती लाच रक्कम स्वीकारली. म्हणून तीन्ही संशयित आरोपीविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.