Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२५ । जळगाव शहराजवळील खेडी शिवरातील कावेरी हॉटेल परिसरातील विद्या नगर येथे आज १७ जानेवारी रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. ज्यात कुत्रा भुंकत आहे त्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून परिसरात राहणाऱ्या नागरीकांना दगड, लाकडी दांडका आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण करण्यात आली. यात या मारहाणीत तीन जण जखमी झाले.
चंद्रकांत जीवराम चौधरी (वय ४०), किशोर अर्जुन पाटील (वय ४२) आणि चेतन लक्ष्मण खडसे (वय ३५) असं जखमींचे नाव असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
खेडी शिवारातील विद्या नगर येथे सोनी वाणी नामक महिलेचा कुत्रा नेहमी या परिसरात भुंकत असतो आणि लहान मुलांवर धावून येतो. तीन दिवसांपूर्वी देखील याबाबत महिलेला समजावून सांगितले होते, परंतु शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा कुत्रा लहान मुलांवर धावून आल्याने परिसरातील नागरिकांनी तिला कुत्रा आवरण्याचे सांगितले. याचा राग आल्याने महिलेने तिच्या ओळखीच्या पाच-सहा जणांना बोलावून घेतले आणि त्यांनी मिळून हल्ला केला.
यात चंद्रकांत चौधरी, किशोर पाटील आणि चेतन खडसे या तिघांना दगड, लाकडी दांडका आणि फरशी मारून गंभीर दुखापत केली. तर त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी या घटनेत परिसरातील नागरीकांच्या अंगावर देखील दगडफेक करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन अज्ञात व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.