चोरीच्या दुचाकीसह मालेगावच्या तिघांच्या जळगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या

मार्च 16, 2026 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढताना दिसतात असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. याचदरम्यान, जळगावातील नवीन बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली दुचाकी अखेर जिल्हापेठ पोलिसांनी शोधून काढली असून या प्रकरणात मालेगावच्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

d

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून एका नागरिकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करण्यात आले.

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढत मालेगाव येथील मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि अबुबकर नईम कौसर यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी जळगाव बसस्थानक परिसरातून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. MH19 BS 1573) ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दुचाकी जप्त केली आहे.

आरोपींनी चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब उघड केली. ते नाशिक येथून टीव्हीएस रायडर (क्र. MH15 JF 3609) या मोटारसायकलवरून जळगावला आले होते. ही मोटारसायकल एका व्यक्तीस विकण्याचे आश्वासन देत कागदपत्रे नंतर देऊ असे सांगून त्याच्याकडून बसस्थानकापर्यंत सोडण्यास सांगितले. त्यानंतर बसस्थानक परिसरातून स्प्लेंडर मोटारसायकल चोरून ती मालेगाव येथे नेल्याचे त्यांनी कबूल केले.

न्यायालयाने या तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख व त्यांच्या पथकाने केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now