मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात ; डंपरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार

सप्टेंबर 26, 2025 4:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघताच्या घटना वाढतच असल्याचं दिसत असून यात सुसाट वेगाने धावणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आता अशातच मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात झाला. ज्यात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

purna fata accident

मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर डंपर(एमएच 19 सीएक्स 2038) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीवर प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातले तीन जण ठार झाले. पती, पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात एक 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

जमावाने आपला संताप व्यक्त करत डंपर पेटवून दिला आणि त्याच्या काचाही तोडल्या. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now