जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

नोव्हेंबर 19, 2021 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । अरबी समुद्रावर गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. सोमवारपासून वातावरण निरभ्र होईल, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

aavkadi jpg webp

या आठवड्यापासून राज्यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. गुरुवारी जळगाव शहरात रिमझिम पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ झाल्याने किमान तापमानदेखील १४ अंशांवरून २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे हवेतील गारठादेखील कमी झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

सोमवारपासून वातावरण निरभ्र होईल, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यात वाऱ्याचा वेगही ताशी १२ किलोमीटरपर्यंत वाढू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे..

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now