रुद्र वेलफेअर फाऊंडेशन व मानवता सेवा संस्थेतर्फे तीन दिवसीय शिबीर

muktainagar news : जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । रुद्र वेलफेअर फाऊंडेशन, नागपूर आणि तालखेडा मुक्ताईनगर येथील मानवता सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १८ वयोगटात असलेल्या लहान मुलांना येणाऱ्या कुमारांचे सृजन यासाठी या मेळावाचे २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान या शिबिरांचे मानवता फार्म येथे तीन दिवसांच्या या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय शिबिरात मुक्ताईनगर तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील ६१ लहान मुलांचे चेकप करण्यात आले.

जळगाव येथील आकाशवाणी केंद्राचे उद्घोषक सतीश पप्पू आणि स्मिता दिक्षित यांनी संवाद कौशल्याची माहिती दिली. महाराष्ट्र विज्ञान परिषदेचे सदस्य सुशांत जगताप यांनी टेलिस्कोप च्या सहाय्याने चंद्र, गुरू, शनी ग्रहांचे दर्शन घडविले. पाणी फाऊंडेशनचे मनजीत भाई यांनी सालईबन बद्दल सांगितले. युवा जल बिरादरीचे राष्ट्रीय संयोजक गिरीश पाटील यांनी नदीची गोष्ट सांगितली. झारखंड मध्ये गांधी फेलो म्हणून काम करत असलेले प्रशांत बावस्कर यांनी कुमारवयीन बदल सांगितले. भारतीय रेल्वेची कार्यपद्धती लोको पायलट शशिकांत माळी आणि टीसी लीलाधर पाटील यांनी सांगितली.

चंद्रपूर येथे आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करणारे डॉ. शैलेंद्र खराटे आणि कुऱ्हा येथील डॉ. महेश नेमाडे यांनी आरोग्याची माहिती देऊन तपासणी केली. सुलेखन बद्दल योगेश जवंजाळ यांनी प्रात्यक्षिक दाखविले. अविनाश निवाने यांनी स्पर्धा परीक्षेची माहिती दिली. सेंद्रिय शेतकरी गणेश ढेंगे आणि निर्माण फाऊंडेशन जालनाचे राजू सोनवणे यांनी आहाराचा आरोग्याशी असलेला संबंध विशद केला. योग्य शिक्षक प्रकाश बावस्कर यांनी योग प्राणायामाचे धडे दिले.

रुद्र फाऊंडेशनचे अजय बत्तुलवार, मानवता संस्थेचे मंगेश ढेंगे, प्रवीण पाटील, संदीप गोंधळी, गणेश ढेंगे, प्रशांत ढेंगे, विजय बा-हे, काशिनाथ ढेंगे, प्रमोद बारी, सचिन पाटील, भाग्यश्री ढेंगे, शीतल शेंडे, ज्योतिका तटीकोंडा, दीक्षा इंगळे, शशिकांत माळी, लीलाधर पाटील, योगेश जवंजाळ, विजय बा-हे, राजू सोनवणे, प्रशांत बावस्कर, रवींद्र हिरोळे यांनी परिश्रम घेतले.