जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील वांजोळा रोड भागात संघटित टोळीतील तीन सदस्य गावठी पिस्तुलाच्या धाकावर दहशत निर्माण करत होते. पाेलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले.असता त्यांना चार दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली.
वांजोळा रोड भागात काही संशयित गावठी पिस्तूल बाळगून शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. यानुसार सोमवारी (दि.३१) रात्री ९ वाजता पोलिस पथकाने तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) व विजय संजय निकम (चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक केली. संशयितांकडून गावठी पिस्तूल व दुचाकी जप्त केली.
हे देखील वाचा :
- किरकोळवादातून दोन गट भिडले
- कांद्याला भाव मिळेना : बेहाल शेतकरी आत्ता करणार अनोखं आंदोलन
- सरपंचपदी सुवर्णा पाटील यांची बिनविरोध निवड
- शाळेच्या पहिल्या दिवशी यंदा दोन शालेय गणवेश
- गिरीश महाजन यांना जामनेर मध्येच अडकवून ठेवा – संजय सावंत
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज