जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । मनोज बागलांडकर या युवकाने आपल्या ट्विट मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ना जीवे मारण्याची धमकी दिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आता वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची असे ट्विट या युवकाने केले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून, या विकृत इसम हा विरुद्ध कडक कारवाई करा अशी मागणी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.
मुंबई शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ल्या करण्यात आल्यानंतर पवार यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे पोलीस प्रशासन याबाबत दक्षता देखील घेत आहेत मात्र नुकतीच राज ठाकरे यांना देखील अशाच प्रकारची धमकी देऊन गेली त्यानंतर आता शरद पवार यांना देखील अशी धमकी आल्याने महाराष्ट्राच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे?
याच बरोबर सुसंस्कृत राजकारणाची पातळी कशा प्रकारे खालावली आहे हेदेखील अशा प्रकारच्या धमक्या बनण्यास समोर येत आहे यामुळे आता नेत्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना वळण्याची गरज आल्या असल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.