जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्षाची सुरुवात होण्यास आता फक्त एक दिवस बाकी आहे. आणि या नवीन वर्षात अनेक मोठे बदल होणार आहे. ज्यांचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. नवीन वर्षात नवीन वाहनांच्या किंमतीपासून ते सोने-चांदीच्या किंमती वाढणार आहे. जाणून घेऊया कोण कोणते नियम बदलणार? New Rule Change
सोने-चांदी महागणार
येत्या वर्षात सोने-चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव ८५ हजारांपर्यंत जातील, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी कमी जास्त होतात. अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2025 रोजी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीत काही बदल करतात की नाही हे पाहणे बाकी आहे. दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय.
UPI पेमेंटची लिमिट
येत्या वर्षात यूपीआय पेमेंटची लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 123Pay सेवेद्वारे यूपीआयची लिमिट ५०,००० ते १०,००० रुपयांपर्यंतची करण्यात आली आहे.
रेशन कार्डचे नियम
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. बनावट रेशन कार्ड बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नवीन वर्षात त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांची ई-केवायसी केली जाणार आहे.
वाहनांच्या किंमती वाढणार
भारतातील कार कंपन्यानी उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. ह्युंदाईने २५,००० रुपयांपर्यंत तर महिंद्रा, मर्सिडीजने ३ टक्के किंमती वाढवल्या आहे. वाहनांचे पार्ट्स महाग झाल्याने या किंमती वाढल्या आहेत.
लक्झरी वस्तूंवर टिसीएस लागणार
आता तुम्हाला हँडबॅग, महागड्या वस्तू, १० लाखांपेक्षा जास्त किंमतीवर घड्याळांवर टिसीएस भरावा लागणार आहे. तुम्हाला १ टक्के टिसीएस भरावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना मोठी भेट
भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा 2 लाख रुपये केली आहे. यापूर्वी ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती. दरम्यान, निर्णयाचा देशातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विशेष छोट्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.