‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी असे आहे ‘पार्कीग’चे नियोजन !
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जळगाव येथे मंगळवार, 27 जून, 2023 रोजी पोलीस कवायत मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
एरंडोल, पारोळा, अंमळनेर, धरणगाव या तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी एकलव्य क्रीडा संकुल मैदान येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. पाळधी रोडकडून येणारी वाहने खोटे नगर – शिव कॉलनी – प्रभात चौक उड्डाणपूलाखालून यु टर्न घेऊन अग्रवाल चौक एकलव्य मैदान येतील.
यावल व चोपडा तालुक्यातून ममुराबाद रोडकडून येणारी वाहने जीएस मैदान, शिवाजी पुतळा येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने ममुराबाद रोड कडून भिलपुरा चौकी- टॉवर चौक – नेहरू पुतळा – सेशन कोर्ट चौक या मार्गाने येतील.
मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, जामनेर, बोदवड तालुक्यातून भुसावळ रोडकडून येणारी वाहने नेरी नाका ट्रॅव्हल्स स्टॉप समोरील मैदान येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने कालिंका माता चौक – अजिंठा चौक- ईदगाह मैदान ट्रॅव्हल्स समोरील पार्कीग बाजूस तर जामनेर रोडकडून येणारी वाहने अजिंठा चौक- ईदगाह मैदान ट्रॅव्हल्स समोरील पार्कीग या मार्गाने येतील.भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी सागर पार्क येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने पाचोरा रोडकडून येणारी वाहने डी मार्ट- काव्यरत्नावली चौक- सागरपार्क या मार्गाने येतील.
जळगाव शहर व तालुक्यातून (आव्हाने, ईदगाव, आसोदा, भादली या ठिकाणाहून ममुराबाद रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी खान्देश सेंट्रल मॉल येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने ममुराबाद रोड वरून -भीलपुरा चौक -टॉवर चौक ते नेहरू पुतळा- गोविंदा रिक्षा स्टॉप उजव्या बाजूस या मार्गाने येतील.याशिवाय एसटी वर्कशॉप मैदान व ब्रूक बँड कॉलनी, रिंगरोड येथे राखीव वाहनतळाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांनी दिली आहे.