बंद घरात चोरट्यांनी साधला डाव, ७२ हजारांचा ऐवज लंपास

जुलै 6, 2022 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील रसलपूर येथे घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत 72 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या वाढत्या चोर्‍यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime theft jpg webp

तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी असलेल्या फरजाना बी.शेख शाकिर यांच्या घराचे लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा सोमवारी रात्री तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत बेडरूममधील स्टीलच्या कोठीचे कुलूप चोरट्यांनी तोडून त्यातील 30 हजारांची रोकड व सोन्याचे दागिने मिळून 72 हजारांचा ऐवज लांबवला.

याबाबत फरजाना बी.शेख यांनी देलेल्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि 457 व 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे व सहकारी करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now