दुचाकीच्या डिक्कीतून पैसे उडवणारा चोरटा शनिपेठ पोलिसांच्या जाळ्यात ; मुद्देमाल जप्त

जुलै 17, 2026 6:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील एचडीएफसी बँकेजवळ झालेल्या १ लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. चोरीस गेलेली संपूर्ण १ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.

klchor

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी दुपारी ३.३० ते ४.४० वाजेदरम्यान फिर्यादी अबरार अली इरफान अली चौधरी (वय २६, रा. लक्ष्मीनगर, मेहरूण, जळगाव) हे कालिका माता मंदिर चौकातील एचडीएफसी बँकेजवळ आले होते. त्यांनी मोटारसायकल पार्क करून पाणीपुरी खात असताना त्यांच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली.

याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

घटनास्थळ व परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान रवि जगदीश प्रजापत (वय ३६, रा. प्रजापत नगर, मामुराबाद रोड, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त केली आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या गुन्ह्याचा जलद छडा लावण्यात शनिपेठ पोलिसांना यश आले आहे.

यांनी केली कारवाई :

सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप-निरी/संतोष खेडकर, पोलीस उप-निरी/अभिषेक कटारे, पोहेका / ३१०६ योगेश जाधव, पोहेका /१३५६ विजय खैरे, पोहेका /१५४६ निलेश दुगो, पोहेका/४०४ पराग दुसाने, पोहेका/३८७अमोल वंजारी, पोहेका /२८५ गणेश ढाकणे, पोहेका /९३६ योगेश साबळे यांनी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण पोहेका/४८५ मुबारक देशमुख या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now