⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

उत्तर भारतातून येणाऱ्या ‘या’ गाड्या हिवाळ्यामुळे होत आहेत लेट

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२३ । संपूर्ण भारतात सध्या सुरु असलेल्या थंडीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आहे. पर्यायी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. धुक्यामुळे परप्रांतातून येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरळीत धावत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून परप्रांतातून जळगावमार्गे मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या सुमारे १५ रेल्वे गाड्या दररोज ४ ते १० तासांपर्यंत विलंबाने धावत आहेत.

उत्तर भारतात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गाड्यांना उशीर होत आहे. वातावरण निवळल्यावर या गाड्या आपोआप वेळेवर धावतील असे म्हट्ले जात आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये बिलासपूर विभागात तांत्रिक कामे सुरु असल्यामुळे काही गाड्यांना विलंब होत आहे.

या गाड्यांना होतायेत लेट

सचखंड एक्स्प्रेस
शालिमार एक्स्प्रेस
पवन एक्स्प्रेस
हावडा एक्स्प्रेस
गीतांजली एक्स्प्रेस
आझाद हिंद एक्स्प्रेस
अमृतसर एक्स्प्रेस
कुशीनगर एक्स्प्रेस
नवजीवन एक्स्प्रेस
जनता
कामायनी एक्स्प्रेस
पंजाब मेल
झेलम एक्स्प्रेस
ताप्तीगंगा एक्स्प्रेस
पुरी-ओखा एक्स्प्रेस

महाराष्ट्र एक्प्रेस रद्द
सोलापूर विभागातील कोपरगाव यार्डात दुहेरी मार्गाच्या कामामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ ते २३ जानेवारी दरम्यान रद्द करण्यात अली आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.