नाथाभाऊंनी आणलेल्या निधीतून शहरातील या रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथे विधानपरीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या निधीतून 20 लाख रुपये खर्चातू मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन अ‍ॅड.रोहिणी खडसे, अ‍ॅड.भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडले. वॉर्ड क्रमांक एक, दोनख तीन व सहासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते थेरोळा हा मुख्य रहदारीचा रस्ता असून रस्त्याचे काम होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपसरपंच पुंडलिक कपले, डॉ.बी.सी.महाजन, डॉ.गजानन खिरडकर, अनिल पांडे, शांताराम इंगळे, विलास हिरोळे, मिस्तरी, हाफिज भाई, पवन पाटील, गजाजन कवडे, विष्णू रोठे, नरसिंग चव्हाण, मयूर साठे, भैय्या कांडेलकर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.