Theft : अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी केल्या लंपास

जुलै 2, 2022 11:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । बोदवड तालुक्यातील दोन भागातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime motar jpg webp

किराणा व्यावसायीक मनोज चांदमल जैन (साकला कॉलनी, बोदवड) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांची 22 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.डी.4002) नाडगाव रोडवरील जेडीसीसी बँकेसमोर लावली असता चोरट्यांनी ती दि. 21 जून रोजी दुपारी चार वाजता लांबवली.

दुसर्‍या घटनेत तक्रारदार गोविंदा काशीनाथ मोझे (वराड बु.॥, ता.बोदवड) यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.5645) ही वराड गावातील घरासमोरून चोरट्यांनी 30 जून रोजी सकाळी चोरट्यांनी लांबवली. तपास नाईक शशीकांत शिंदे व संदीप वानखेडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now