जळगाव लाईव्ह न्युज । १५ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात आजवर आपण गाय, बैल, वासरू चोरी झाल्याच्या घटना नेहमी ऐकल्या आहेत परंतु आज चक्क म्हैस चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकऱ्याच्या खळ्यातील गोठ्यात बांधलेल्या ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवाशी सुरेश लिलाधर झोपे (वय-६३) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त असून गुरांसह शेतीचा व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या दोन म्हशी गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात बांधलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आला. याबाबत सुरेश झोपे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. अतुल महाजन करीत आहे.
हे देखील वाचा:
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते