जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । येथील विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जळगावतर्फे याेग वर्ग तर बालकांसाठी संस्कार वर्गाचे आयाेजन करण्यात आले असून ते भाऊंचे उद्यानात माेफत आहेत.
सदर शिबीर हे सोळा वर्षांवरील सर्वांसाठी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळामध्ये नियमित विनामूल्य सुरू आहे. यामध्ये विविध प्रकारचे योगासने व प्राणायाम शिकवले जातात. बालसंस्कार वर्ग श्रीधरनगरात दर शनिवारी व रविवारी या वेळेत घेण्यात येतो. लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बालसंस्कार वर्ग घेण्यात येत आहे. या वर्गामध्ये शारीरिक चपळता वाढवणारे व बौद्धिक विकास घडवणारे विविध खेळ, विविध कौशल्य विकसित करणारे उपक्रम, भजन, स्तोत्र, गोष्ट, गीत, सूर्यनमस्कार, मंथन अशा विविध माध्यमातून मुलांमध्ये राष्ट्रप्रेम व आत्मविश्वास विकसित करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले जाते. या योग वर्गासाठी श्रुती मुजूमदार तर बालसंस्कार वर्गासाठी मल्हार बाभुळके व रंजना बाभुळके यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आले आहे.