तरुणीचा पाठलाग करीत काढली छेड, जमावाने दिला तरुणाला चोप

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । सार्वजनिक स्वच्छतागृहात गेलेल्या 24 वर्षीय तरुणीची छेडखानी करून अश्लील वर्तन करणार्‍या तरुणास संतप्त जमावाने चांगलेच चोपून काढल्याची घटना घडली. हा प्रकार भुसावळ शहरातील जुना सातारा भागात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीस अटक केली आहे.

crime 76 jpg webp

स्वच्छतागृहापर्यंत पाठलाग
24 वर्षीय तरुणीचा आरोपी शोएब सैय्यद लियाकत (25, लाल बिल्डींगजवळ, भुसावळ) याने पाठलाग करीत जुना सातारा भागात सार्वजनिक शौचालतही गाठत तेथे लघूशंका केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या तरुणीने आजूबाजूच्या नागरीकांना हा प्रकार सांगताच आरोपी शोएब यास चोपून काढले. शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशा तडवी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now