जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ झालीय. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणात दोन एकूण ३५.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलै महिन्यात पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ना झाल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ झालेली नव्हती. पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी यंदा जिल्ह्यातील अनेक धरणांतील जलसाठ्यात वाढ न झाल्याने चिंता अधिकच वाढली होती.
परंतु ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्यातील चार प्रकल्पामध्ये एक टक्केही जलसाठा झालेला नाहीय. जिल्ह्यातील धरणात आज मंगळवारपर्यंत एकूण ३५.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष गतवर्षीपेक्षा यंदाच्या जलसाठ्यात २ टक्क्याहून अधिकची वाढ दिसून आली. गेल्या वर्षी ३३.७३ टक्के जलसाठा होता. असं असले तरी यंदा काही प्रकल्पांच्या जलसाठ्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्णपणे उघण्यात आले ३८,०७० इतक्या पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केला जात आहे. तसेच जळगाव शहरासह काही तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या गिरणा धरणात मागील दोन तीन दिवसात मोठी वाढ दिसून आलीय. दरम्यान, आगामी काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे…
धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टक्के)
हतनूर – यंदा २८.३९ टक्के – गतवर्षी ३०.९८
गिरणा – यंदा ३७.२० टक्के – गतवर्षी – ३४.३५
वाघूर – ६४.९६ टक्के – गतवर्षी – ५६.८६
मध्यम धरणांमधील सध्या स्थितीचा जलसाठा?
अभोरा – यंदा ७८.४२ टक्के – गतवर्षी १०० %
मंगरूळ- यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
सुकी – यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
मोर – यंदा ६९.९१ टक्के – गतवर्षी ६२.४७ टक्के
बहुळा – यंदा ११.८८ टक्के – गतवर्षी १०.६९ टक्के
अग्नावती – यंदा २.५८ टक्के – गतवर्षी ०० टक्के
तोंडापूर – यंदा ३८.११ टक्के – गतवर्षी ४३.४५ टक्के
अंजनी – यंदा ६.९३ टक्के – गतवर्षी ४३.८३ टक्के
गूळ – यंदा ६३.६६ टक्के – गतवर्षी ५२.०४ टक्के
शेळगाव बॅरेज – यंदा ०७.५६ टक्के – गतवर्षी ०० टक्के
या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा शून्यावर
जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत १२५ टक्के पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असताना जिल्ह्यातील चार हिवरा, बोरी, मन्याड, भोकरबारी या प्रकल्पांमध्ये एक टक्केही जलसाठा झालेला नाही.