⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सडावण गावाचा पाणीप्रश्न सुटला

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील सडावण गावास पाणीटंचाईच्या जखड्यातून बाहेर काढण्यासाठी आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 1 कोटी 48 लक्ष ची पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्याने या योजनेचे थाटात भूमीपूजन आ.अनिल पाटलांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गावात आयोजित करण्यात आलेल्या भूमीपूजन सोहळ्यात 2515 अंतर्गत गावात 10 लक्ष निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण करणे- 15 लक्ष आमदार निधीतुन सात्वन शेड व पेव्हर ब्लॉक बसविणे व जलजीवन मिशन अंतर्गत 148 लक्ष निधीतून गावात पाणीपुरवठा योजना करणे इत्यादी 1 कोटी 73 लक्ष च्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले,पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता देखील झाली असून केवळ टेंडर प्रोसेस बाकी आहे.गावासाठी पाणीपुरवठा योजनेसह समाधानकारक कामे मिळाल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे जल्लोषात स्वागत करून जंगी सत्कार केला.यावेळी आमदार अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मतदारसंघातील विकास कामांचा आढावा मांडून येणाऱ्या काळात पुरेश्या विकासकामांमुळे अनेक गावे समस्यांमुक्त झालेली असतील अशी ग्वाही दिली.

यावेळी सरपंच पंढरीनाथ भिल, प्रकाश हिंमत पाटील, निंबा भिकन पाटील, जिजाबराव चुडामन पाटील, गुलाब मुरलीधर पाटील, मधुकर भीमराव पाटील, निंबा गंगाराम पाटील, अशोक आनंदा पाटील, मधुकर भिकाजी पाटील, सुपडू भिकन पाटील, विजय लोटन पाटील, दिलीप पुंडलिक पाटील, लोटन मच्छिंद्र पाटील, अशोक हिम्मत पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश पंडित पाटील, विनोद हिम्मत पाटील, नामदेव महादू पाटील, बाळू गयबु पाटील, हिरामण गयबु पाटील, रत्‍नाबाई पंडित यासह ग्रामस्थ उपस्थित होते.