गुन्हेमुक्ताईनगर
वाहन दरीत कोसळले, निमखेडीच्या जवानाला काश्मीरला वीरमरण!
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील ‘निमखेडी बुद्रुक’ येथील रहिवासी नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली. ते जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे सैन्य दलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. दरम्यान, ते सेवा बजावत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेने निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.
नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे हे तालुक्यातील ‘निमखेडी बुद्रुक’ येथील ते मूळचे आहेत. भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. ते जम्मू-काश्मिर येथे सेवा बजावत होते. दरम्यान ते उधमपूर येथे सेवेत असताना त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाले आहे. त्यांचे पार्थिव गावी आल्यानंतर त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.