⁠ 
बुधवार, मे 8, 2024

बोदवड तालुक्यातील १४, मुक्ताईनगर तालुक्यातील ३ गावांची पुनर्जिवित पाणी पुरवठा योजना कार्यान्वित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । बोदवड तालुक्यातील १४ व मुक्ताईनगर तालुक्यातील ३ गावांची पुनर्जिवित पाणी पुरवठा योजना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक दि.11 रोजी पार पडली होती. या बैठकीत २०१८ पासून प्रलंबित पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार बोदवड तालुक्यातील शिरसाळे, कोल्हाडी, चिंचखेड सिम, एनगाव, वरखेड, घाणखेड, वडजी, हरणखेड, चिंचखेड प्र.बो., हिंगणे, आमदगाव, सोनोटि, जुनोना, निमखेड व मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा, माळेगाव, निमखेडी या गावांची पुनर्जीवित पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. बोदवड शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व तालुक्यातील उर्वरित पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहेत.