चोपड्या जवळ भीषण अपघात : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

ऑक्टोबर 28, 2022 5:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ आज दुपारी समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यावेळी भयानक अपघात झाला. या अपघातात मामा-भाची जागीच ठार झाले. यात ६ वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे. पर्यायी परिसरात हळळ व्यक्त केली जात आहे.

accident 22 jpg webp

अधिक माहिती अशी कि, दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिरा समोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एचआर 56 बी 4688) मध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एक सहा वर्षीय बालिका जागीच ठार झाली आहे. तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) आणि एक महिला गंभीर जखमी आहे. यार एक दीड वर्षीय चिमुकला सुखरूप आहे.

अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक मंदावली होती. दरम्यान, शेवटची वृत्त हाती आले तेव्हा जखमी महिलेला जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तसेच मयत हा आपल्या बहिणीला घेऊन विरवाडे ता. चोपडा येथून आपल्या घरी जात असल्याचे म्हट्ले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now