ठाकरे गटाला खिंडार : ५०हुन अधिक पदाधीकारी शिंदे गटात

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाध यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र त्या आधीच आधी शिंदे गटाने उध्दव ठाकरे गटाला मोठाधक्का दिला आहे. जेष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी असा ५० हून अधिक जणांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

अधिक माहिती अशी कि, प्रवेश केलेल्या शिवसैनिकांमध्ये स्व.आनंद दिघे यांचे जुने सहकारी देखील आहेत असे म्हटले जात आहेत. नाशिक जिल्हातील उध्दव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून प्रवेश केल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिक बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला.

नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ शिवसैनिक शिवाजी पालकर (माजी महानगर प्रमुख, राजेंद्र घुले, गणोश शेलार, रामभाऊ तांबे, प्रशांत जाधव, मंगेश दिघे, मयुर जोशी, निलेश शेवाळे आदींसह इतर महत्वाच्या पदाधिका:यांचा यात समावेश आहे.