घर खाली करायला सांगितले म्हणून भाडेकरूने घरमालकासोबत केलं धक्कादायक कृत्य…

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । भडगाव तालुक्यातील देव्हारी या गावात घर खाली करायला सांगितले म्हणून भाडेकरूने ५३ वर्षीय घरमालकीन महिलेस विषारी औषध बळजबरीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना २९ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी ३ जणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

crime 18 jpg webp

अधिक माहिती अशी की, नीला अरुण देवरे (वय ५३, रा. श्रमिक नगर नाशिक ह.मु. देव्हारी कानाशी ता. भडगाव) यांनी २९एप्रिल रोजी अजबराव हिलाल पाटील यांना सांगितले की, ‘तुम्ही आमचे घर खाली करुन द्या’. त्याचा राग आल्याने अजबराव पाटील व विकास बाबुराव पाटील हे दोघे निला देवरे यांच्याजवळ जवळ आले. व रोहिदास अजबराव पाटील याने निला देवरे यांना धक्का मारुन खाली पाडत कराटे नावाचे विषारी औषध बळजबरीने पाजले.

पुढील तपास पोलीस करत आहेत…

एवढेच नव्हे तर दोघांनी निला देवरे यांचे पती अरुण देवरे यांना बांबुने मारहाण केली. विवाहितेला अस्वस्थ वाटत असल्याने त्या महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जळगावातील जिल्हापेठ पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदविला. यावरुन संशयित अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील (रा. देव्हारी कनाशी ता.भडगाव) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now