गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

जून 13, 2022 12:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 13T123016.202 jpg webp

शहरातील आंबेडकर नगरात सागर सुरेश सपकाळे (वय २८) रा. कोळीपेठ जळगाव हा बेकायदेशीर हातात गावठी पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी सागर सुरेश सपकाळे यांला शनीपेठेतील आंबेकडकर नगरातून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now