⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जबाबदार नागरिक बनण्याचा विद्यार्थ्यांनी केला संकल्प

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२। मराठी नववर्ष गुढीपाडवाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा सुजाण विद्यार्थी आणि समाजाचा जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प केला.

के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात गुढीपाडवा सणाच्या पूर्व संध्येला विद्यार्थ्यांनी पारंपारिक गुढीसोबत विद्यार्थ्यांनी ज्ञानाची, शौर्याची, शिक्षणाची, विज्ञानाची, खेळाची कल्पक गुढी बनविली आणि शिक्षकांच्या सोबत गुढीचे पूजन केले तसेच गुढीपाडवा सणाची सविस्तर माहिती देण्यात आली आणि नववर्षाचा संकल्प केला. प्रत्येक वर्गातून उत्कृष्ठ गुढी बनवलेल्या विद्यार्थ्यांना एक रोप बक्षिस म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एन.बी.पालवे एम.एस.नेमाडे, सतिश भोळे, इ.पी.पाचपांडे, डी.ए.पाटील, आर.एन.तडवी,बी.डी.झोपे,पराग राणे माधुरी भंगाळे, वर्षा राणे, पूनम कोल्हे, मनिषा ठोसरे, अशोक तायडे अनिल शिवदे यांनी सहकार्य केले.