जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२२ । येथील दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे रविवार दि २४ रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेता सचिन खेडेकर, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, डॉ. दीपक शाह (पुणे) उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थी सहाय्यक समितीचे रमाकांत तांबोळी (पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. स्वामी विवेकानंद पुरस्कार पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासह उबुंटु चित्रपटातील ‘माणसाने माणसाशी माणसा सम वागणे…’ या गीताला देण्यात आला. डॉ. उज्ज्वल चव्हाण, पत्रकार संदीप काळे (मुंबई), मिशन ५०० कोटी जलसाठा (चाळीसगाव), बुकलेट अपचे अमृत देशमुख (ठाणे), योगी फाउंडेशनचे गिरीश पाटील (चोपडा) यांना हे पुरस्कार देण्यात आले. सूत्रसंचालन फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी केले. डॉ. रेखा महाजन यांनी मान्यवरांचे आभार मानले.