वृद्धला रिक्षात बसवून वाटेत निर्मनुष्य जागी लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

ऑगस्ट 1, 2022 2:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । वयोवृद्ध आणि धनिक प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवून वाटेत निर्मनुष्य जागी त्यांना लुटण्याचे अनेक प्रकार आपण ऐकले आहेत. तसेच पोलिसांनी उघड देखील केले आहेत. रिक्षा चालकाच्या भुमिकेत राहून आपल्याच गुन्हेगार मित्रांना प्रवाशाच्या रुपात आधीच बसवून नंतर बसलेल्या प्रवाशाची वाटेत लुटमार करण्याची पद्धत काही गुन्हेगारांनी अवलंबली आहे. एका नाशिकच्या ७८ वर्षीय वयोवृद्धाच्या बाबतीत असाच प्रकार जळगाव शहरात घडला. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.

amalner 17 jpg webp

आकाश उर्फ चोक्या अरुण जोशी, लक्ष्मण उर्फ चिंट्या जोशी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नाशिक येथून जळगावला मुलीला भेटाण्यासाठी आलेल्या उत्तमराम वाघ (वय ७०, रा. नाशिक) यांना सदर आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना मेहरूण परिसरात शुक्रवारी घडली.

या प्रकरणी शनिवारी वाघ यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून रात्री गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच येथील गुन्हे शोध पथक गुन्ह्याची पद्धत व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्यास सुरवात झाली. आणि सदर आरोपी जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक रवाना होऊन सदर आरोपींना अटक करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now