जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२३ । राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय देणं बेकायदेशीर होतं. पण उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही कारण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. असा निर्णय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिला. यावेळी सरन्यायाधीशांनी सरकार बनतानाच्या सर्वच घटनाक्रमावर ताशेरे ओढले. अश्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भावनिक साद घालण्याच्या नादात शिंदे सरकार वाचल असच म्हणता येईल

गेल्या ११ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. विविध वाद प्रतिवाद यावेळी करण्यात आले. आज या सत्तासंघर्षाचा निकाल आला. यावेळी न्यायालयाने त्यावेळी झालेल्या सर्व घटनाक्रमावर चागंलेच ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही कारण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. असेही न्यायालय म्हणाले.
यामुळे भावनेचे राजकारण करण्याच्या नादात उद्धव ठाकरे यांनी खूप मोठी चूक केली आहे. असेच म्हणाले जातील. जर त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता आणि सहानुभूचे राजकारण न करता घटनात्मक बाजू समजून घेत, वेळ घेऊन आणि विचार करत राजीनामा दिला नसता तर आजचे चित्र वेगळे असते.