अबब…सुरक्षा रक्षकांनीच केले कंपनीतील भंगार लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । एमआयडीसी परिसरातील जे सेक्टरमधील स्टार फॅब्रिकेटर कंपनीतून कंपनीच्या सुरक्षा रक्षकासह एकाने 90 हजार रुपयांचे भंगार लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

crime 2022 06 01T144307.919 jpg webp

एमआयडीसी जे-सेक्टरमध्ये स्टार फॅब्रिकेटर कंपनी आहे. कंपनीतून 3 प्रेस टुल डाईज व कंपनीच्या आवारात पडलेले पत्राचे तुकडे असे ९० हजारांचा मुद्देमाल कंपनीतील सुरक्षारक्षक सतीश नाना बाविस्कर यांच्यासह एकाने चोरून नेल्याचे १० मे रोजी रात्री ९.१५ सुमारास सुपरवायझर यांनी केलेल्या पाहणीत समोर आले. चोरून नेलेल्या मुद्देमालाची संपूर्ण खात्री करत सुपरवायझर धिरज विलास नारखेडे यांनी मंगळवार 31 मे रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून सुरक्षारक्षक सतीश बाविस्कर यांच्यासह त्याचा एक अज्ञात साथीदार या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुधीर सावळे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now