जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर येथील मुख्य चौकात परवानगी घेऊन रितसर लावलेल्या झेंड्याच्या फोटोत छेडछाड करुन मूळ झेंड्याचा रंग बदलून अन्य रंगाचा झेंड्याचा फोटो, काही समाजकंटकांनी धार्मिक तेढ वाढावे, गावातील खेळीमेळीचे वातारण दुषित व्हावे व दोन धर्मात वाद निर्माण व्हावे, या दुषीत हेतुने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील संतप्त हिंदु बांधवांनी मुक्ताईनगर पोलीसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपुर येथुन पायी प्रवास करीत परतणाऱ्या पालख्या व दिंडीतील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी दि. १ ऑगस्ट रोजी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करीत शहरात दिंडी रस्त्यावर रांगोळ्या, पताका, झेंड्यांनी सजविले. यामध्ये हिंदु-मुस्लिम समाज व अन्य समाज धर्माच्या लोकांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे स्वागत केले.पालखी सोहळा १ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात धार्मिक वातावरणात पार पडला.
असे असताना काही समाजकंटकांनी धार्मिक तेढ वाढावे, गावातील खेळीमेळीचे वातारण दुषित व्हावे व दोन धर्मात वाद निर्माण व्हावे, या दुषीत हेतुने दि. २ ऑगस्ट रोजी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मुख्य चौकात लावलेल्या झेंड्यांना इडिट करुन त्याजागी अन्य रंगाचा झेंडा दर्शवुन आक्षेपार्ह तथा हिंदु बांधवांच्या व वारकरी संप्रदाय च्या भावना दुखावतील अशा पद्धतीने सोशल मिडियावर (फेसबुक,व्हाटसप) या पेजवर व्हायरल करून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रकार सोशल मिडियाद्वारे केला.
सदरच्या या प्रकारामुळे हिंदु बांधवांचा प्रचंड रोष निर्माण होऊन धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा उद्रेक होऊ नये, यासाठी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा व कायदेशीर कारवाई व्हावी. अन्यथा धार्मिक भावना दुखाऊन झालेल्या या समाजकंटकांच्या कृतीमुळे गावातील वातावरण दुषित होऊन दंगली घडविल्या जावू शकतात. या गोष्टीची दक्षता घेऊन गांभीर्याने प्रकरण हाताळण्यात यावे व दोषींवर कठोर कारवाई यावी अशी हिंदु बांधवांनी केली आहे.