घनःशामनगरातून रिक्षा लांबविली

एप्रिल 21, 2022 2:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ एप्रिल २०२२ । येथील घनशामनगरात घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. शहरात वाहने चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

crime १ 1 jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घनशाम नगरातील मानवशाळेजवळ सुनील ऊर्फ एकनाथ अंबिकार वय ५२ हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मालकीची रिक्षा असून ते त्यावर उदरनिर्वाह करतात. दि १९ एप्रिल रोजी सुनील अंबिकार यांनी नेहमीप्रमाणे रात्री त्यांची एम.एच. १९ सीडब्लू ०५५६ या क्रमांकाची रिक्षा घरासमोर उभी लावली होती. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बाहेर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना जागेवर रिक्षा आढळून आली नाही. या घाटाने बाबत श्री अंबिकार यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now