Jalgaon : 40 मिनिटातचं तलाठीचा पेपर सोडविणाऱ्यांचा निकाल लागला..

मार्च 31, 2024 12:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२४ । गतवर्षी राज्यभरात झालेल्या तलाठी भरतीतील लेखी परीक्षेत अवघ्या ४० मिनिटांत पेपर सोडवून बाहेर पडणाऱ्या ६२ जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या सर्वच उमेदवारांची पुराव्यानिशी पडताळणी करून निकाल लावण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.

त्यानुसार जळगावच्या तिघा उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांनी ‘शाळा’ भरवली आणि उत्तरे देण्यात गडबडल्याने तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश रामभाऊ गेठे (अमरावती), भूषण रघुनाथ पाटील (गोताणे, ता. जि. धुळे) व भागवत जनार्दन परिहार (अंजरवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी या तीनही आरोपींची नावे आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी या तिघांच्या भूमिकेविषयी पडताळणी केली. संगणकीय गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघड झाल्याने महसूल विभागाच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now