डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा

सप्टेंबर 10, 2026 1:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते सर्जा-राजाची पूजा करण्यात आली.

bailpola 1
New Project 2

यावेळी बैलांना सजवून त्यांची आरती करण्यात आली तसेच उपस्थितांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.शेतकर्‍याचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषि अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे,अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी,संचालक सतिष सावके,डॉ. मिलींद तायडे, प्रा.सुशिल चव्हाण, परिचारीका अधिक्षक मनिषा खरात,प्रा किर्ती पाटील, डॉ. गुणवंतराव सरादे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले,प्रशासन अधिकारी चेतन चौधरी, देवेंद्र भंगाळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम साधत महाविद्यालयात बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनात बैलांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच कृषी संस्कृतीशी त्यांची नाळ जोडली जावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now