रावरमध्ये झालेल्या खुनाचे कारण आले समोर ! तुम्हालाही बसेल धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२३ । रावेर तालुक्यातील सायबूपाडा-निमड्या रस्त्यावरील अली नाल्याजवळ 30 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. हि घटना उघडकीस आली होती. यामुळे एकाच खळबळ उडाली होती.

रावेर पोलिसांनी 24 तासात तपासचक्रे फिरवून खुनाचा उलगडा केला आहे. संजय रेमसिंग पावरा (30, सायबूपाडा नवाड, ता.रावेर) या तरुणाच्या खून प्रकरणी किनेश उर्फ किन्या सजन पावरा (28, सायबूपाडा नवाड, ता.रावेर) या तरुणास अटक करण्यात आली आहे.

मयताचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयित आरोपीला संशय होता व त्यातून त्याने हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सायबूपाडा गावातील संजय पावरा या तरुणाचे घराशेजारी राहणार्‍या विवाहितेशी अनैतिक संबंध असल्याचा महिलेच्या पतीला संशय होता व 7 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संशयित आरोपी किनेश पावरा याने सायंकाळी संजय यास गावाबाहेर नेवून त्यास दारू पाजली व तो मद्यधूंद होताच त्याच्या डोक्यात व तोंडावर मोठा दगड टाकला.

दगडाच्या प्रहाराने व मेंदूला मार लागल्याने संजय याचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर संशयित घरी परतला मात्र घटनास्थळी मयताचा फुटलेला मोबाईल, दोन रीकाम्या दाूरच्या बाटल्या तसेच मयताची दुचाकी आढळल्यानंतर तज्ज्ञ ठसे टिपले तसेच श्वानाने काही अंतरापर्यंत माग दाखवला.

पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासल्यानंतर घटनास्थळी मयत व आरोपी यांचे लोकेशन मिळाल्यानंतर संशयित किनेश पावरा यास ताब्यात घेण्यात आले. पावरा हा दुचाकी दुरुस्तीसाठी रावेरात आल्यानंतर त्याने जणू काही आपल्याला माहित नाही असा आर्विभाव आणला मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

फैजपूर पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन नवले, कल्पेश आमोदकर, किशोर सपकाळे, सचिन घुगे, मनोज काटे, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, अमोल जाधव, विकार शेख, उमेश नरवाडे, रवींद्र भामरे, मुकेश मेढे, दीपक ठाकुर, सुरेश मेढे, समाधान ठाकुर व स्थानिक गुन्हे शाखेचे नाईक नितीन बाविस्कर, संदीप सावळे, ईश्वर पाटील, भारत पाटील, महेश महाजन, मोतीलाल चौधरी आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.