जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । शिंदखेडा-शिरपूर रस्त्यावरील भरवस रेल्वे पुलाजवळ आता दोन्ही बाजूला काँक्रीटीकरण होणार असल्याने प्रवाशांचे पावसाळ्यातील हाल थांबणार आहेत. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या कामाचे भूमिपूजन आमदार भाईदास पाटील यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले.
भरवस गावाजवळ रेल्वे बोगद्याच्या उजव्या व डाव्या बाजूला रस्ता गेल्या पाच वर्षात अत्यंत दयनीय झालेला होता. यामुळे रेल्वे पुलाजवळ पावसाळ्यात पाणी साचून पुलाखालून कच्चा रस्ता आहे. पुलाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला उतार असून यामुळे रस्त्यावरील दोन्ही भागातील पाणी थेट रेल्वे पुलाखाली साचत असे यामुळे पावसाळ्यात मोटार सायकलस्वार व इतर वाहने तासनतास खोळंबून असतात. यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होत असते. यामुळे छोटे मोठे अपघातात वाहनचालक जखमी होतात. यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावला.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सदस्य संभाजी लोटन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. रामराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, लोणचारम सरपंच विवेक पाटील, लोण खुर्दचे सुशील पाटील, झाडी सरपंच भूपेंद्र पाटील, भरवस सरपंच अशोक पाटील यांच्यासह नितीन महारु पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील, दिलीप साहेबराव पाटील, प्रकाश शांताराम पाटील, संजय माधवराव पाटील उपस्थित होते.
आता हाल थांबणार
कोरोना असल्याने विकासकामे ठप्प होती. यंदा काही प्रमाणात सुरु झाले असल्याने यंदा हे काम आपल्या स्थानिक विकास कार्य क्रमांतर्गत मंजूर केले व त्याचे आता भूमिपूजनदेखील झाले. यामुळे परिसरातील वाहनचालक बैलगा डीमालक शेतकरी यांचा मुख्य प्रश्न सुटला आहे.