सर्वसामान्यांना झटका! जळगावात सोयाबीन तेलाचा भाव पुन्हा वाढला
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२५ । दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोयाबीनचे दर गेल्या दीड महिन्यापासून स्थिर होते. मात्र आता त्यात पुन्हा एकदा वाढ झालीय. या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला जोरदार धक्का बसणार आहे. Jalgaon oil Rate
जळगावात सोयाबीन तेलाचे (Soybean oil) भाव प्रति किलोमागे ६ ते ८ रुपयांनी वाढले आहे. आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महिन्याभरापूर्वी सोयाबीन तेलाचे प्रति किलोचे दर १२७ ते १३५ रुपये दरम्यान होते. ते आता वाढून १३३ ते १४० रुपये झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे.
दरवाढीची कारणे अशी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार नवे जागतिक आयात धोरण आखत आहे. सर्वच आयात मालावर १० टक्के वाढ, चीनच्या आयातीवर ६० टक्के शुल्क वाढ, कॅनडा व मॅक्सिकोच्या आयातीवर २५ टक्के शुल्क वाढ विचाराधीन आहे. त्याचे परिणाम दिसत आहेत.